Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 142 नवीन रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 142 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 36 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (मंगळवार) शहरामध्ये एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 142 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 2 हजार 010 वर पोहचली आहे. आज 36 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 98 हजार 063 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये पालिका हद्दीतील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेला रुग्ण पुनावळे येथील रहिवासी आहेत. आतापर्यंत शहरात 2598 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1827 शहरातील तर 771 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 708 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 112 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 116 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.