Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 253 नवीन रुग्ण, 11 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 253 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 292 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (सोमवार) शहरामध्ये 11 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 253 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 5 हजार 957 वर पोहचली आहे. आज 292 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 1 लाख 684 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटले असले तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

गेल्या 24 तासामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पालिका हद्दीतील 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर हद्दीबाहेरील 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपरी, काळेवाडी, पिंपळे निलख, भोसरी, निगडी, चिंचवड, जुन्नर, आळंदी, देहुफाटा, कात्रज येथील आहेत. आज मृत्यूची नोंद झालेले रुग्ण हे मागील कालावधीतील असून गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरात 2625 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1850 शहरातील तर 775 पालिका हद्दीबाहेरील आहेत.

सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1141 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 177 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 147 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.