Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 602 नवीन रुग्ण, 255 जणांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 602 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 255 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शुक्रवार) शहरामध्ये चार कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 602 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 7 हजार 832 वर पोहचली आहे. आज 255 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 1 लाख 1 हजार 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटले असले तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

गेल्या 24 तासामध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले रुग्ण रावेत, वडगाव शेरी, खडकी, जळगाव येथील आहे. आतापर्यंत शहरात 2634 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1855 शहरातील तर 779 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1 हजार 241 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 183 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 38 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रभाग निहाय आढळून आलेले रुग्ण
अ प्रभाग – 74, ब प्रभाग – 93, क प्रभाग – 75, ड प्रभाग – 104, इ प्रभाग -69, फ प्रभाग – 57, ग प्रभाग – 80, ह प्रभाग – 50