Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात धोका वाढला ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 635 नवीन रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाला असताना पिंपरी-चिंचवड शहरातील
कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 635 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात 479 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (मंगळवार) शहरामध्ये 5 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोना बाधित रुग्णांची
संख्या 1 लाख 10 हजार 070 वर पोहचली आहे. तर 1 लाख 3 हजार 232 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गेल्या 24 तासामध्ये 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला रुग्ण भोसरी, चिखली, खेड, खराबवाडी, पौड येथील आहे. आतापर्यंत शहरात 2646 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1861 शहरातील तर 785 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1 हजार 370 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.