Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2784 नवीन रुग्ण, 2257 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. तसेच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये कोरोनाच उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 2784 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 2257 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 हजाराच्यावर गेली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) दिवसभरात शहरात 2284 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजार 768 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2257 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 32 हजार 386 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 4113 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 13 रुग्ण शहरातील आहेत. तर 3 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2960 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2107 तर हद्दीबाहेरील 853 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण सांगवी, थेरगांव, काळेवाडी, चिंचवड, वडमुखवाडी, पिंपरी, भोसरी, रहाटणी, हडपसर, पुणे येथील रहिवाशी आहेत.