Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोना (Corona) बाधित रुग्णांची संख्या कमी होत असताना मृतांची संख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील रुग्णांची संख्या कमी झाल्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल (Lockdown rule) करण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात शहरात 240 नवीन रुग्णांचे (New patient) निदान झाले आहे. तर 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आज शहरातील 07 आणि पालिका हद्दीबाहेरील 05 अशा एकूण 12 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरात 4 हजार 217 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत 2 लाख 53 हजार 713 लोक पॉझिटिव्ह (Positive) आढळून आले आहेत. त्यापैकी 2 लाख 47 हजार 176 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या 2 हजार 320 इतके सक्रिय रुग्ण (Active patient) आहेत. यापैकी 1 हजार 755 रुग्ण होम क्वारंटाईन (Home quarantine) आहेत. तर 565 सक्रीय रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत. शनिवारी (दि.12) शहरामध्ये 61 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. आज दिवसभरात 2573 जणांना लस (Vaccine) देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 5 लाख 26 हजार 563 जणांना लस देण्यात आली आहे.

pimpri chinchwad coronavirus news updates|policenama

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

कोरोना रुग्णांना SBI ची भेट ! किरकोळ व्याजदरावर मिळेल 5 लाखापर्यंत कर्ज

कोट्यवधी केंद्रीय कर्मचार्‍यांना झटका ! मोदी सरकार करणार ‘या’ भत्त्यांमध्ये 20% कपात, जाणून घ्या का घेतला निर्णय?

Lockdown मध्ये पत्नीच्या तुलनेत पतीवर जास्त अत्याचार, पुणे पोलिसांच्या ‘ट्रस्ट सेल’चा धक्कादायक खुलासा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा