Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 792 नवे पॉझिटिव्ह

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरात मागील दोन दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटल्याने आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. शहरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होत असताना मृतांची संख्या वाढत आहे. शहारातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 30 हजाराच्या वर गेली आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये 792 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 30 हजार 619 वर पोहचली आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये 792 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 30 हजार 619 एवढी झाली आहे. आज आढळून आलेल्या 792 रुग्णांपैकी 783 रुग्ण शहरातील आहेत. आज शहराबाहेरील 9 रुग्ण आढळून आले आहेत. तर शहराबाहेरील 437 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 60 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान मनपा हद्दीतील 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील मृतांचा आकडा 627 वर पोहचला असून 510 रुग्ण शहरातील तर 117 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 590 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 21 हजार 798 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 5313 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये निगडी, भोसरी, दिघी, पिंपरी, दापोडी, मोरवाडी, वाकड, चिंचवड, पिंपळे निलख, पुनावळे, तसेच पुणे मनपा हद्दीमध्ये निगडी, भोसरी येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.