Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 1190 नवीन रुग्ण, 21 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात 1190 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1390 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये 1190 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 हजार 483 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 1190 रुग्णांमध्ये 1104 रुगण हे शहरातील आहेत. तर 86 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहराबाहेरील 1281 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 430 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 21 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 रुग्ण शहरातील आहेत तर 9 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 1390 वर पोहचला आहे. यामध्ये 1077 रुग्ण शहरातील तर 313 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 1071 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 55 हजार 853 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 6415 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये चिंचवड, चिखली, कोकणेनगर, सांगवी, तळवडे, पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी, दापोडी, खेड, मारुंजी, जुन्नर, लोहगाव, कात्रज, मावळ आंबेगाव, चाकण, कुरकुंडी येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.