Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये 2468 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अशरश: थैमान घातले आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 1 जुन पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. रुग्ण वाढत असताना मृत्यूची संख्या वाढत होती. मात्र, मागिल काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत घट झाली असून मृतांची संख्या देखील कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 914 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 59 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 914 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 41 हजार 734 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2468 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 20 हजार 259 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 17 हजार 825 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 59 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 44 रुग्ण शहरातील आहेत. तर 15 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 3650 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये 8 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहे. आज दिवसभरात 1429 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 4 लाख 63 हजार 494 जणांना लस देण्यात आली आहे.