Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’मुळं 20 जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. शहरामध्ये आज दिवसभरात 946 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर आज दिवसभरात 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 662 वर पोहचली आहे. रुग्ण वाढत असताना शहरातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

सध्या शहरामध्ये पाच हजाराच्यावर रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 946 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 32 हजार 565 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 946 रुग्णांपैकी 922 हे शहरातील आहेत. तर 24 रुग्ण शहारा बाहेरील असून शहराबाहेरील 489 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 71 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये शहरातील 13 आणि शहराबाहेरील 7 रुग्णांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. शहरातील मृतांचा आकडा 662 वर पोहचला आहे. यामध्ये 538 रुग्ण शहरातील तर 124 रुग्ण शहराबाहेरील आहेत.
शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 448 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 22 हजार 453 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 5853 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये काळभोरनगर, नेहरुनगर, रहाटणी, खराळवाडी, निगडी, चिखली, भोसरी, काळावाडी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, यमुनानगर, लोणावळा,धायरी, आळंदी, मुळशी, देहुरोड, मरकळगाव, जुन्नर येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.