Coronavirus : गेल्या 24 तासात पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 379 नवे पॉझिटिव्ह तर 9 जणांचा मृत्यू, 286 रूग्ण झाले बरे

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज दिवसभरात 379 रुग्णांची कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर शहरात एकाच दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये शहरातील 9 आणि शहराबाहेरील 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात आज दिवसभरात 379 रुग्ण आढळून आले असून यामध्ये 361 शहरातील आणि 18 शहराबाहेरील रुग्ण आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7637 इतकी झाली आहे. शहरात रुग्ण वाढी बरोबरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 286 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 4598 रुग्ण बरे झाले आहे. या सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज शहरात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये भाटनगर, इंदिरानगर, आकुर्डी, मिलिंदनगर, यमुनानागर, भोसरी, पिंपरीगाव, निगडी आणि शहराबाहेरील चाकण आणि खडकी बाजार येथील रुग्णांचा समावेश आहे. सध्या शहरामध्ये 2122 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये मंगळवार पासून पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे.