Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा कहर सुरुच ! आज दिवसभरात 716 नवे पॉझिटिव्ह तर 21 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कडक उपाययोजना करण्यात येत आहे. आज दिवसभरात 716 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 21 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनामुळे मृत्यूची संख्या वाढली आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात 716 कोरोनाचे नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 13 हजार 784 इतकी झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 677 रुग्ण शहरातील तर 39 रुग्ण हे शहराबाहेरील आहे. या रुग्णांसह 296 रुग्णावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील 55 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरात बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

आज दिवसभरात शहरामध्ये 398 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 9049 इतकी झाली आहे. आज शहरात एकाच दिवशी 21 रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये शहरातील 17 तर 4 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरामध्ये एकूण 322 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 255 रुग्ण हे शहरातील आहेत तर 67 रुग्ण शहराबाहेरील आहेत. सध्या शहरामध्ये 3447 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज एकाच दिवशी 21 मृत्यू झाले असून मृत व्यक्ती हे तळवडे, वाकड, पिंपरी, पिंपळे सौदागर, आकुर्डी, चिंचवड, भोसरी, चिखली, थेरगाव, मोशी, काळेवाडी, पिंपरी, चाकण, खडकी, देहूरोड येथील रहिवासी आहेत.