Pimpri Chinchwad Corporation | महापालिकेची महासभा सत्ताधारी भाजपाने रेटली, 10 मिनिटांत 22 विषय मंजूर करत गुंडाळले कामकाज

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Chinchwad Corporation | पिंपरी-चिंचवड महापालिकेची (Pimpri Chinchwad Corporation) आजची महासभा वादळी आणि वादग्रस्त ठरली. स्थायी समितीच्या अध्यक्षांना लाचप्रकरणी झालेल्या अटकेने (standing committee chairman adv nitin landge) आक्रमक झालेल्या विरोधकांना टाळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ही सभा रेटण्यात आली. अवघ्या 10 मिनिटात सत्ताधारी भाजपाने (BJP) 22 विषय मंजूर करत कामकाज गुंडाळले. त्यामुळे विरोधक आणखीच आक्रमक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, ही वादग्रस्त आणि बेकायदेशीर महासभा रद्द करण्याची मागणी विरोधक राज्य सरकारकडे (Maharashtra Government) करणार आहेत.

 

स्थायी समिती अध्यक्षांच्या अटकेचे तीव्र पडसाद

सकाळपासूनच विरोधकांनी आणि सामाजिक संघटनांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारा समोर आंदोलन सुरू केले होते. स्थायी अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच कर्मचार्‍याना लाच प्रकरणी अटक झाली असल्याने त्याचे पडसाद या महासभेत उमटले.

 

महापालिका बरखास्त करा – विरोधक

सत्ताधार्‍यांना या लाचप्रकरणी जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांनी महापौर दालनासमोर आंदोलन केले. यावेळी महापालिका बरखास्त करावी, स्थायी समिती बरखास्त करा, महापौरांनी राजीनामा द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, समीर मासूळकर, विनोद नढे, राहुल भोसले, मोरेश्वर भोंडवे, संजय वाबळे, सचिन भोसले, वैशाली काळभोर, उषा वाघेरे, उषा काळे आदी सहभागी झाले होते.

 

अशी 10 मिनिटांत गुंडाळली सभा

या गोंधळाच्या वातावरणातच दुपारी 02.05 वाजता महापौर कक्षातून सभेचे कामकाज सुरु झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. यानंतर विरोधकांनी स्थायी समिती सभागृहात जाऊन महापौरांशी बोलू देण्याची विनंती केली. मात्र, त्याकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्याने आक्रमक विरोधकांनी महापौर दालनाकडे धाव घेतली. यावेळी त्यांना सुरक्षारक्षकांनी रोखले. या गडबडीत सत्ताधारी भाजपाने अवघ्या 10 मिनिटात सभेचे कामकाज रेटून नेत संपविले. 2 वाजून 15 मिनिटांनी महासभा संपली होती.

 

सभेतील कामकाज रद्द करा

यानंतर विरोधकांनी महापौरांना जाब विचारला.
महापालिकेच्या इतिहास पहिल्यांदा बंद दाराआड महासभा घेतली गेली.
ही सभा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. विरोधकांचा आवाज म्युट करण्यात आला.
आम्हाला बोलू दिले नाही, असे आरोप विरोधकांनी केले.
सभेतील कामकाज रद्द करण्याची मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार असल्याचे विरोधकांनी म्हटले.

 

नगरसेवक म्हणून घेण्याची लाज वाटते

स्थायी समिती अध्यक्षाला अटक केली ते पोलीस कोठडीत आहेत.
हे निंदणीय असतानाही कोणतीही लाज न बाळगता सत्ताधारी भाजपाने चर्चा होऊ दिली नाही.
सभेचे कामकाज रेटून नेले.
आम्हाला नगरसेवक म्हणवून घेण्याची लाज वाटते, असा संताप विरोधकांनी महापौरांसमोर व्यक्त केला.

 

मी कोणाच्या दबावात नाही – महापौर

विरोधकांच्या या आरोपावर महापौर ढोरे यांनी म्हटले की, स्थायीत सर्वपक्षीय नगरसेवक आहेत.
मी कोणाच्या दबावाखाली काम करत नाही.
आजची सभा नियमप्रमाणे पार पाडली आहे.

Web Title : Pimpri Chinchwad Corporation | bjp approved 22 issues in ten minutes and wrapped up the proceedings of the meeting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणीची दत्त मंदिरात आत्महत्या, परिसरात खळबळ

Booster Dose Planning | महाराष्ट्रात कधी दिले जाणार बूस्टर डोस? अजित पवार म्हणाले…

Floating ATM | तलावात तरंगणारे अनोखे ATM, ग्राहकांसाठी SBI ने सुरू केलेली विशेष सेवा बनली आकर्षणाचे केंद्र