Pimpri Chinchwad Crime Branch News | १ कोटीच्या खंडणीसाठी जमीन मालकाचे अपहरण करुन झारखंड, पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीच्या बेटावर ठेवले डांबून

Pimpri Chinchwad Crime Branch News | kidnapped the landowner for ransom of 1 crore and kept him on an island in the river Ganga on the Jharkhand, West Bengal border

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने सुटका करुन तिघांना केली अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pimpri Chinchwad Crime Branch News | एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी (Extortion Case) जमीन मालकाचे अपहरण करुन झारखंड, पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीच्या बेटावर डांबून ठेवले होते. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गंगा नदीच्या पात्रात बोटीतून आणि चिखलातून पायी प्रवास करुन गोलढाब बेटावर छापा टाकून अपहरण केलेल्यांची सुटका केली. अपहरण करणार्‍या दोघांना व कल्याणहून एकाला अशा तिघांना अटक केली आहे. (Kidnapping Case)

नसीम मनीरुल हक अख्तर (वय २०, रा. धरमपूर, तीन मुहानी ठाणे, मुथाबाडी, जि. मालदा, पश्चिम बंगाल), लल्लु रुस्तम शेख (वय ४५, रा. अमानत दियारा ठाणे, राधानगर, जि. साहेबगंज, झारखंड) आणि साजीम करीम बबलु शेख (वय २०, रा. छक्कुटोळा, ता. मोथाळवाडी, जि. मालदा, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अपहरण झालेल्या जमीन मालकाचा मुलगा १८ ऑक्टोंबर रोजी खंडणी विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांना भेटून आपले वडिल १७ ऑक्टोंबर पासून घरी नसून त्यांना वडिलांच्या मोबाईल फोन वरुन १ कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास तसेच पोलिसांकडे गेल्यास तक्रारदारांचे वडिलांना जीवे ठार मारु अशी धमकी दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तातडीने तपासाला सुरुवात केली.

(Kidnapping Case) अपहरण झालेल्यांना नारळ पाणी विक्रेत्याने विमानाने कोलकत्ता येथे घेऊन गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुणे विमानतळावरील कोलकत्त्याला जाणार्‍या विमानातील प्रवाशांची माहिती घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन संशयितांची माहिती घेण्यात आली. मिळालेल्या मोबाईल नंबरचे हवालदार सुनिल कानगुडे व नागेश माळी यांनी तांत्रिक विश्लेषण करुन संशयितांचे मोबाईल नंबर प्राप्त केले. दरम्यान, गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, अशोक जगताप व पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, मंगेश जाधव, रामदास मोहिते हे झारखंड, पश्चिम बंगालला रवाना झाले.

अपहरण करणार्‍यांनी तक्रारदार यांच्या वडिलांच्या मोबाईलवरुन १ कोटी रुपये लवकर जमा कर, पोलिसांकडे गेल्यास अगर काही गडबड केल्यास तुझ्या वडिलांना ठार मारुन टाकू अशी धमकी देऊन रात्री १० वाजेपर्यंत पैसे जमा कर. त्यानंतर कोठे यायचे ते सांगतो, असे सांगून फोन बंद करत होते. त्यानंतर पुन्हा सायंकाळी साडेसात वाजता आरोपींनी फोन करुन पैसे किती जमा झाले़, अर्धा तासात पुणे रेल्वे स्टेशन येथे घेऊन ये, असे कळविले. अपहरण झालेल्यांच्या मुलाला खंडणीच्या पैशांकरीता फोन येत असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पश्चिम बंगालच्या मालदाचे पोलीस अधीक्षक व झारखंडमधील साहीबगंजचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून त्यांना या गुन्ह्यांची माहिती दिली. तपासात मदत करण्याचे कळविले.

त्यानंतर गुन्हे शाखेकडील पथक,झारखंडमधील राजमहल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाने रात्रीच्या अंधरात आरोपींचा पालचगाची प्राणपूर, बनुटोला आणि गोल ढाब खोर्‍यात गंगा नदीतून बोटीतून आणि चिखलातून पायी प्रवास करुन आरोपींचा माग काढत होते. गंगा नदी पात्रात गोलढाब बेटावर छापा मारुन पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अपहरण झालेल्या व्यावसायिकाची सुखरुप सुटका केली. तेथून नसीम व लल्लु यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील ३ मोबाईल जप्त केले. त्यांचे ३ साथीदार गंगा नदीत उडी मारुन पळून जाण्यात यशस्वी झाले.

आरोपींचा एक साथीदार हा कल्याण येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेकडील सहायक फौजदार रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार गावांडे व राणे यांनी कल्याण येथे गेले. त्यांनी साजीम शेख याला २ मोबाईलसह अटक केली. तसेच इतर तीन आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत. पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी सांगितले की, अपहरण केलेली व्यक्ती जमीन मालक आहे. त्यांना नारळ विक्रेत्याने फिरायला जाऊ असे सांगून कोलकत्ता येथे विमानाने नेले होते. त्यांनी घरी फिरायला जातो, असे सांगितले होते. नारळ विक्रेता अजून सापडलेला नसून त्याचा शोध सुरु आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे तसेच संपूर्ण गुन्हे शाखा पथक अहोरात्र जागून झारखंड येथील पोलिसांशी समन्वय साधून तांत्रिक मदत करुन आरोपींचा ताब्यात घेतले व अपहरण झालेल्यांची सुखरुप सुटका केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, सहायक फौजदार रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, मंगेश जाधव, आशिष बोटके, भुपेंद्र चौधरी तसेच गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, रामदास मोहिते, युनिट ४ कडील पोलीस अंमलदार प्रशांत सैद, सुखदेव गावांडे व अमर राणे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa

MVA Seat Sharing Formula | काँग्रेस- शिवसेना ठाकरे वादात शरद पवारांची मध्यस्थी सकारात्मक; जागावाटपाचा तिढा सुटला

Former MLA Kapil Patil | समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक

MVA Seat Sharing Formula | महाविकास आघाडीचे जागावाटप कधी जाहीर होणार? नाना पटोलेंनी सांगितला मुहूर्त; जाणून घ्या

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट? अमित शहांना राऊतांचा फोन? या चर्चेवर काँग्रेसचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न’

Ajit Pawar NCP | अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवारांना मोठा झटका; उमेदवारीचा शब्द पाळला नाही म्हणत बड्या नेत्याचा राष्ट्रवादीला रामराम

Total
0
Shares
Related Posts
Sonia Gandhi Birthday | Inauguration of Service, Duty and Sacrifice Week by Prithviraj Chavan on the occasion of Sonia Gandhi's birthday; Former Chief Minister said - 'Sonia Gandhi a visionary leader'

Sonia Gandhi Birthday | सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन; माजी मुख्यमंत्री म्हणाले – ‘सोनिया गांधी दूरदृष्टीच्या नेत्या’