ADV

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिला दलालावरती कारवाई, पाच पिडीत महिलांची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime Branch | निगडी पोलीस ठाण्याच्या (Nigdi Police Station) हद्दीतील हॉटेल/लॉजमध्ये मुलींना पैशाचे आमिष दाखवून (Lure Of Money) त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिला दलालावरती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने (Pimpri Chinchwad AHTU) कारवाई केली. या कारवाईत पाच मुलींची सुटका करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड आयुक्तालय मधील निगडी पोलीस स्टेशन हद्दीत महिला दलाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेगवेगळ्या लॉज व हॉटेल याठिकाणी वेश्याव्यवसाय (Prostitution Racket) करण्यास भाग पाडतात अशी गोपनीय माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळाली.

निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील, लॉजवर अचानक छापा टाकला असता, महिला आरोपीच्या ताब्यातून पाच
महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली. महिला आरोपी यांना ताब्यात घेऊन निगडी पोलीस स्टेशन येथे आयपीसी 370(3),
सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील
पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुडे,
भगवंता मुठे, गणेश कारोटे, सुधा टोके, वैष्णवी गावडे, सोनाली माने यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कोयत्याने वार करत दगड, सिमेंटच्या गट्टूने ठेचून ताडी विक्रेत्याचा निर्घृण खून, तळवडे रोडवरील थरार

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : फोटो मॉर्फ करुन खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक, पोलिसांकडून कोलकाता येथील कॉल सेंटर उध्वस्त; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त (Video)

Raj Thackeray | बिनशर्त पाठिंबा तरी राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजपाकडून डॅमेज कंट्रोल सुरू?

Supriya Sule | पुण्यातील नालेसफाईच्या कामाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी