Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : प्रेमसंबंधातून महिलेचा खून, आरोपीला काही तासात गुन्हे शाखेकडून अटक (Video)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime Branch | प्रेमसंबंधातून (Love Affair) डोक्यात दगड घालून 30 ते 35 वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना दिघी पोलीस ठाण्याच्या (Dighi Police Station) हद्दीत शनिवारी (दि.20) उघडकीस आली होती. यानंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने गुन्हा घडल्यानंतर काही तासात आरोपीला अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. (Murder Case)

ज्ञानेश्वर गजानन इंगोले (वय-31 रा. आळंदी देवाची, मुळ रा. खुटी पांगरी, ता मालेगाव, जि. वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी आठच्या सुमारास दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रायणी नदीकाठी (Indrayani River) भागेश्वर धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत उघडकीस आली होती.(Pimpri Chinchwad Crime Branch)

दाखल गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट तीनची दोन पथके तयार करण्यात आली होती. एका पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही तपास करत होती. तर एक पथक महिलेसोबत शेवटी कोण होते याचा तपास करत होती. त्यावेळी पोलीस अंमलदार सानप, कोळेकर व मेरगळ यांच्या पथकाला माहिती मिळाली की, एक संशयीत व्यक्ती हा वडगाव रोडवरील सुपर बाझार च्या मागील बाजूला दुचाकी घेऊन थांबला असून त्याच्या अंगावर रक्ताने माखलेले कपडे आहेत.

पथकाने त्याठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या अंगावरील कपड्यावरील रक्ताच्या डागासंदर्भात चौकशी केली.
त्यावेळी त्याने सांगितले की, महिले सोबत प्रेम संबंध होते. तो तिच्यासोबत लग्न करणार होता.
मात्र, ती इतर पुरुषांसोबत दिसून आल्याने रागाने चिडून जावून रात्री तिच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली.
तसेच त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबात चौकशी केली असता दुचाकी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची
कबुली दिली. आरोपीला पुढील कारवाईसाठी दिघी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदिप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठ्ठल सानप, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, राहुल कुलकर्णी यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raviwar Peth Pune Fire | रविवार पेठ: भोरी आळी येथे दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण (Video)

Baramati Lok Sabha | भोर विधानसभा मतदारसंघातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश

Pune Crime Branch | पुणे : सराईत वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 3 गुन्हे उघडकीस

Lohegaon Pune Crime | पुणे : मैत्रिणीसोबत ठेवले संबंध, अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर केला व्हायरल

Baramati Lok Sabha | बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का? अजित पवार म्हणाले, 7 मे पर्यंत भावनिक…