Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरातच सुरू होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून परदेशी महिलेची सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime Branch | सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi Police Station) हद्दीतील पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथे एका सदनिकेत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution Racket) गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Police) अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या (Pimpri Chinchwad AHTU) पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तसेच युगांडा (Uganda) येथील पिडीत महिलेची सुटका करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (दि.19) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोहीनुर प्लाझा (Kohinoor Plaza) येथील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये करण्यात आली.(Pimpri Chinchwad Crime Branch)

निखील किरण मोरे Nikhil Kiran More (वय-25 सध्या रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव मुळ रा. मु.पो. भोई गल्ली, शेंदुर्णी ता. जामनेर जि. जळगाव) याच्यावर आयपीसी 370(2), सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार सुधा अशोक टोके यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरामनगर (Shivram Nagar Sangvi) परिसरातील कोहीनुर प्लाझा मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीची पोलिसांनी खात्री करून सदर ठिकाणी छापा टाकला असता युगांडा येथील तरुणी वेश्याव्यवसाय करताना दिसून आली. पोलिसांनी या तरुणीची सुटका करून निखील मोरे याला अटक केली.

आरोपीने पैशाचे आमिष दाखवून या तरुणीला आणले होते. त्यानंतर या तरुणीला जास्त पैशाचे आमिष दाखवून तिच्याकडून आरोपी या ठिकाणी वेश्याव्यवसाय करून घेत होता. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे
तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे
पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व पोलीस पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashish Shelar On Baramati Lok Sabha | भाजपा नेते आशिष शेलार यांनी बोलता-बोलता एक मोठी चूक केली; म्हणाले… (Video)

Supriya Sule | …ही आहे शरद पवारांची ताकद ! न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात

Amit Shah On Ajit Pawar | भाजपासोबत गेल्याने अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या चौकशा थांबल्या का? अमित शहा म्हणाले…

Pune Lok Sabha Election 2024 | गाजावाजा न करता वसंत मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वांनाच वाटले आश्चर्य