Pimpri Chinchwad Crime Branch Police | दापोडीत पावणे 3.75 लाखांचा गुटखा जप्त, 2 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime Branch Police | शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याचा साठा (gutkha seized) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch Police) अमली पदार्थ विरोधी पथकाने (anti narcotics cell) जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 3 लाख 70 हजार 711 रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि.16) दुपारी दापोडी येथे करण्यात आली. आरोपींवर भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) गुन्हा दाखल करुन 2 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

गोट्या उर्फ शरद अगरवाल (रा. रास्ता पेठ, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मिश्रीलाल समाराम परिहार (वय-40 रा. जयभीमनगर, दापोडी), सचिन कलाधर (रा. वडारवाडी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप छबु शेलार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परिहार याने शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा साठा करुन
ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे यश सहकारी गृहरचना येथील
एका घरावर छापा टाकला. त्यावेळी एका खोलीत पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचा शासनाने प्रतिबंधित केलेला
गुटखा, सुगंधीत तंबाखू व पान मसाला आढळून आला. पोलिसांनी एका मोपेडसह सर्व मुद्देमाल जप्त केला.

आरोपींविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे करित आहेत.

हे देखील वाचा

EPFO | कामाची गोष्ट ! पेन्शनधारकांसाठी ‘हा’ नंबर अत्यंत महत्वाचा, अन्यथा अडकू शकतात तुमचे पैसे; जाणून घ्या

MP Amol Kolhe | ‘पवार साहेबांचा आशिर्वाद डोक्यावर आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर’ – खासदार डॉ. अमोल कोल्हे (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Chinchwad Crime Branch Police | Gutka worth Rs 3.75 lakh seized in Dapodi, 2 arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update