पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या ACP 1 पदी आर. आर. पाटील तर ACP 2 म्हणून श्रीधर जाधव यांची नियुक्ती

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – गुन्हेशाखेचे विस्तारीकरणानंतर गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे बंधू आर. आर. पाटील यांची गुन्हे शाखा एक आणि गुन्हे शाखा दोनला श्रीधर जाधव यांची नियुक्ती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर सतीश पाटील यांच्याकडे गुन्हेशाखेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पाटील हे ३१ मार्च ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर गुन्हेशाखेच्या दोन युनिटचे पाच युनिट करण्याचे आदेश आयुक्तांनी नुकतेच दिले होते. यादरम्यान, राजाराम रामराव पाटील यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. गुरुवारी पाटील हे आयुक्तालयात हजर झाले. त्यापूर्वी झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये शहरातील दैनंदीन घडामोडींबाबत आणि गुन्हेगारीवर अधिक सक्षम अंकूश आणण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत आयुक्त पद्मनाभन यांनी सूचना दिल्या.

त्यानंतर सायंकाळी गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्तपदी आर. आर. पाटील व श्रीधर जाधव यांची नियुक्तीचे आदेश आयुक्तांनी दिले. आयुक्त पद्मनाभन यांनी यापूर्वी तीन / तीन पोलिस ठाण्यांसाठी एका युनिटची निर्मिती केली. यामध्ये भोसरी (भोसरी, चिखली, भोसरी एमआयडीसी), पिंपरी (पिंपरी, चिंचवड, निगडी), चाकण (चाकण, दिघी, आळंदी), वाकड (हिंजवडी, वाकड, सांगवी), देहूरोड (तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड) अशी विभागणी करण्यात आली आहे.

राजाराम रामराव पाटील यांच्याकडे एसीपी क्राईम १ म्हणून भोसरी, पिंपरी, चाकण या तीन युनिटसह खंडणी / दरोडा प्रतिबंधक विभाग, तांत्रिक विश्लेषण पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, आर्थिक गुन्हेशाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर एसीपी क्राईम २ म्हणून श्रीधर जाधव यांच्याकडे वाकड, देहूरोड या युनिटसह गुन्हे प्रतिबंधक शाखा, एमओबी, सायबर गुन्हे, महिला तक्रार निवारण कक्ष, फॉरेन्सिक युनिट, डॉग स्कॉड या शाखांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ 

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु 

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय 

डायट प्लॅन करताय.. ? वापरा या टिप्स