Pimpri Chinchwad Crime News | स्वयंघोषीत भाईचा व त्याच्या साथीदारांचा निगडी प्राधिकरणात राडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime News | मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका व्यक्तीच्या कारची दगड मारुन काच फोडली. याचा जाब विचारला असता कोयता उगारला. भाईगिरी करणाऱ्या व त्याच्या साथीदारांविरुद्ध निगडी पोलिसांनी (Nigdi Police) गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 16) पहाटे म्हाळसाकांत चौक ते लोकमान्य हॉस्पिटल चौक दरम्यानच्या सार्वजनिक रोडवर घडली.(Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सुजित शामराव जाधव (वय-54 रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन बारक्याभाई, दुध्या, आदल्या, नन्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) व इतर चार अनोळखी मुलांवर आयपीसी 307, 506, 427, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एक आरोपी निष्पन्न करुन त्याला अटक केली आहे. अविनाश राजु शिंदे (वय-20 रा. ओटास्कीम, निगडी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे शनिवारी पहाटे मॉर्निंग वॉक करत होते.
त्यावेळी तिथे आलेल्या एका टोळक्याने रस्त्यावर पडलेला दगड जाधव यांच्या कारवर मारून कारची मागील काच
फोडून नुकसान केले. त्याबाबत जाधव यांनी आरोपींना जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपीने हातात कोयता
घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून आला. आरोपीने फिर्यादी यांचा गळा आवळून ‘मला बारक्या भाई म्हणतात’ असे
म्हणून इतर साथीदारांना बोलावून घेतले.

आरोपींनी फिर्यादी त्यांच्यावर कोयत्याने डोक्यावर वार केला. मात्र त्यांनी ते वार चुकवून तिथून आरडाओरडा करत
पळ काढला. काही आरोपींनी जाधव यांचा कोयता, काठ्या घेऊन पाठलाग केला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एकाची ओळख पटवून अटक केली आहे. पुढील तपास निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी