Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवडमध्ये धारदार शस्त्राने वार करत एकाची हत्या; आरोपी फरार

Pimpri Chinchwad Crime News | One killed by sharp weapon in Pimpri Chinchwad; Accused absconding

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime News | चिखली मधील कृष्णा चौकात एका व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महेश चामे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अज्ञात कारणावरून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Murder Case)

अधिक माहितीनुसार, महेश चामे हे रस्त्याच्या कडेला मोबाईल स्क्रीन गार्ड लावण्याचा व्यवसाय करतात. ते मूळचे लातूर येथील असून सध्या ते चिखली येथील नवचैतन्य सोसायटीमध्ये राहात होते. दि.८ सकाळी चिखली पोलिसांना कृष्ण नगर चौक ते चेरी चौक या मुख्य रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली.

मृत अवस्थेत पडलेल्या महेश यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. याबाबत चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याबाबत माहिती मिळालेली नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts