Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकावले, अश्लील हावभाव करुन विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime News | मुलाला मारहाण केल्याची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकी दिली. तसेच विक्षीप्त हावभाव व अश्लील शिवीगाळ करुन विनयभंग (Molestation Case) केला. हा प्रकार गुरुवारी (दि.11) दुपारी दोनच्या सुमारास भुमकर वस्ती वाकड येथील भामा पर्ल सोसायटीत घडला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.(Pimpri Chinchwad Crime News)

याप्रकरणी पीडित 37 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. संदीप बबन मुंडे (वय 38, रा. भुमकर वस्ती, वाकड) याच्यावर आयपीसी 452, 509, 504, 506(2) सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला मारहाण केली होती.
त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. याचा राग आरोपीच्या मनात होता.
गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी महिला घरी असताना आरोपी कटर आणि लाकडी दांडके घेऊन आला.
त्याने फिर्यादीला शिवीगाळ करुन खिडकीला धक्का देत खिडकी उघडली.
तसेच हातातील कटर आणि लाकडी दांडके दाखवून ‘तुम्ही बाहेर या आज तुम्हाला मारुन टाकतो’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
तक्रार मागे घ्या असे बोलून आरोपीने फिर्यादीवर दबाव आणून शिवीगाळ करत वारंवार धमकी दिली. तसेच फिर्यादी सोबत गैरवर्तन करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri PMPML Bus Accident | पिंपरी : पीएमपीएमएल बसच्या धडकेत मजुराचा मृत्यू

Jayant Patil On BJP | पवारसाहेब भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते, हीच ‘त्या’ नेत्यांची अडचण होती, जयंत पाटलांचे प्रत्युत्तर