Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : भंगार व्यावसायिकाला सळईने मारहाण, आरोपी गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime | भंगार गोळा करणाऱ्या महिलांना समोरच्या दुकानात भंगार का टाकले अशी विचारणा केल्याच्या रागातून एका भंगार व्यावसायिकाने दुसऱ्या भंगार व्यावसायिकाला लोखंडी सळईने मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.10) दुपारी तीनच्या सुमारास मोई गावच्या हद्दीतील निघोजे-माई रोडवरील भंगाराच्या दुकानात घडला.

याबाबत मारुफ मकबुल खान (वय-29 रा. मोई, ता. खेड) याने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन श्रीराम यादव (रा. मोई-चिखली रोड, मोई ता. खेड) याच्यावर आयपीसी 326, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दोघेही भंगार व्यवसायिक आहेत.
फिर्यादी खान यांनी भंगार गोळा करणाऱ्या महिलांना 500 रुपये अॅडव्हान्स दिला होता.
असे असतानाही त्या महिलांनी आरोपी यादव याच्या भंगार दुकानात भंगार टाकले.
त्याबाबत खान यांनी महिलांना जाब विचारला.
याचा राग आल्याने आरोपी श्रीराम यादव याने खान यांना लोखंडी सळईने बेदम मारहाण केली.
शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On BJP | पवारसाहेब भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते, हीच ‘त्या’ नेत्यांची अडचण होती, जयंत पाटलांचे प्रत्युत्तर