पिंपरी-चिंचवड; फेसबुवर मित्र झालेल्या तरुणाने केला विवाहित तरुणीचा विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन
फेसबुकवरून ओळख झालेल्या तरुणाने एका विवाहित तरुणीचे जगणे कठीण केले आहे. तो आता तरुणीच्या सासरच्या व्यक्तींना फोन द्वारे तरुणी सोबत विवाह करायचा आहे असे म्हणत असून फेसबुक आणि व्हाट्सऍपवर आत्महत्येची धमकी देत आहे,त्याचबरोबर तरुणीला शिवीगाळ करत असून मानसिक त्रास देत आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात विवाहित तरुणीने फिर्याद दिली असून किरण तौर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२९ वर्षीय फिर्यादीची संशयित आरोपी किरण तौर सोबत तीन वर्षापूर्वी फेसबुकवर मैत्री जमली. आरोपी हा फिर्यादीला भेटायला पुण्यात येत असे. याच दरम्यान तरुणीच लग्न जमले याची माहिती तिने फेसबुक वरील मित्राला म्हणजेच किरण तौरला दिली हे त्याला सहन झाले नाही आणि त्याने त्यावेळेस पासून ते लग्न झाल्यानंतर देखील तरुणीला वारंवार मानसिक त्रास दिला आहे.

आता तर तो थेट तिच्या सासरच्या मंडळीसह पाटील फोन करून फिर्यादी सोबत लग्न करायचे आहे असे सांगत आहे. त्याच बरोबर फिर्यादी ही माझी नाही तर कोणाचीच नाही असा दम देखील त्यांना दिला आहे. त्यामुळे परिवारात खळबळ उडाली आहे. फिर्यादी विवाहित तरुणीच्या फेसबुक आणि व्हाट्सऍपवर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल अशी धमकी देखील देत फिर्यादीच्या शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात विवाहित तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी किरण तौर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक घोडे या करत आहेत.