Pimpri Chinchwad Fire News | पिंपरी-चिंचवडमध्ये अग्नितांडव, फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Fire News | पिंपरी चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत (Talawade MIDC) असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या घटनेत 10 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात (Sassoon Hospital) तातडीने दाखल करण्यात आले आहे. मृतांप्रती आयुक्त शेखर सिंह (Commissioner Shekhar Singh) यांनी शोक व्यक्त केला असून कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे. (Pimpri Chinchwad Fire News)

आगीची वर्दी मिळताच महापालिकेचे 7 अग्निशमन (Fire Brigade) वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींचे शव यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (YCM Hospital) आणले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस यंत्रणा (PCPC Police) करीत आहेत. जखमी झालेल्यापैकी 8 व्यक्तींना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तात्काळ ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. तर 2 व्यक्तींना थेट पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Pimpri Chinchwad Fire News)

जखमींची नावे

शिल्पा राठोड (वय-31), प्रतिक्षा तोरणे (वय-16), अपेक्षा तोरणे (वय-26), कविता राठोड (वय-45), रेणुका राठोड (वय-20), शरद सुतार (वय-45), कोमल चौरे (वय-25), सुमन राठोड (वय-40), उषा पाडवे (वय-40), प्रियंका यादव (वय-32)

ही दुर्दैवी घटना – पालिका आयुक्त शेखर सिंह

या घटनेबाबत बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, या दुर्घटनेत सहा जाणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरु केले. वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात जवळपास 20-25 कामगार काम करत होते. मात्र, दुपारच्या सुमारास आग लागली आणि कामगारांनी आरडा ओरडा करत या कारखान्यातून बाहेर पडले. मात्र, सहा जणांना स्वत:चा बचाव करता आला नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

अनधिकृत फटाक्याचा कारखाना

पिंपरी चिंचवड शहर परिसरात अनेक कारखाने अवैधरित्या चालवले जातात. मात्र या भीषण आगीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अवैधरित्या चालवणाऱ्या गोदामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अवैधरित्या कारखाना व गोदामांवर प्रशासन कारवाई करणार का? हे पहावे लागले.

पोलीस आयुक्त, खासदार यांच्याकडून जखमींची विचारपूस

खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barne), पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey), आयुक्त शेखर सिंह यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे येऊन जखमींची विचारपूस केली. तसेच घटनेबद्दल सविस्तर माहिती घेतली. याठिकाणी महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे (Joint CP Dr. Sanjay Shinde), अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi), अग्निशमन विभागाचे उप आयुक्त मनोज लोणकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, डॉ. शिवाजी पवार, डॉ. काकासाहेब डोळे (DCP Kakasaheb Dole), तहसीलदार अर्चना निकम (Tehsildar Archana Nikam), विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध अधिकारी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील,
डॉ.अनिकेत लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले.

ही घटना अतिशय दुर्दैवी – देवेंद्र फडणवीस

पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे ‘फायर कँडल’ तयार करणार्‍या एका कारखान्याला आग लागून 6 महिलांचे मृत्यू झाल्याची
घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेतील जखमींना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचाराची काळजी घेतली जात आहे.
पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती सर्व मदत दिली आहे.
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,
असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.

दुःखद घटना – आमदार महेश लांडगे

तळवडे येथील जोतिबा मंदिराजवळील कंपनीला भीषण आग लागली. यामध्ये 15 महिला कामगार अडकल्याचे समजते.
त्यामध्ये आठ ते दहा महिला मृत झाल्याची भिती व्यक्त होत आहे. प्रशासनाने घटनास्थळी पाच अग्निशमन बंब
मदतकार्यासाठी रवाना केले आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृत कामगारांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पिंपरी-चिंचवडच्या उद्योग क्षेत्रासाठी हा काळा दिवस म्हणावा लागेल. दुर्घटनेमध्ये मृत्युमूखी पडलेल्या कामगारांना
भावपूर्ण श्रद्धांजली..!, अशी प्रतिक्रीया भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landge) यांनी सोशल
मीडीयाच्या माध्यमातून दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तळवडे परिसरातील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, सहा महिलांचा होरपळून मृत्यू, 8 जण गंभीर

पुण्यात प्रियांक खर्गे यांच्याविरोधात आंदोलन, सावरकरांबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजप युवा मोर्चा आक्रमक

Maharashtra Assembly Winter Session 2023 | कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीवरील बंदीबाबत अजित पवार सभागृहात म्हणाले, ”गरज पडल्यास…”

Shweta Tiwari Hot Photo | श्वेता तिवारीच्या मादक अदेवर चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो..

किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

Ajit Pawar | नवाब मलिकांसंदर्भातील फडणवीसांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”त्या पत्राचे काय करायचे ते…”

Pune Crime News | जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक, येरवडा परिसरातील प्रकार