Pimpri Chinchwad Firing Case | पिंपरी चिचंवडमध्ये भरदिवसा 3 ठिकाणी गोळीबार; आरोपी 4 तासांत गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Firing Case | पिंपरी चिंचवड शहरात तीन ठिकाणी गोळीबार करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अवघ्या चार तासांत पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरोपींनी बुधवारी (दि.6) सायंकाळी पत्राशेड झोपड़पट्टी (Patra Shed), रेल्वेलाइन (Railway Line), लिंक रोड चिंचवड (Link Road) येथे एका रिक्षातून येऊन हवेत गोळीबार (Pimpri Chinchwad Firing Case) केला होता. या घटनेमुळे शहरामध्ये (Pune Pimpri Crime) प्रचंड खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेत असताना या गुन्ह्यात शाहरुख शेख हा आरोपी असल्याचे दिसून आले. आरोपी शाहरुख शेख हा दापोडी परिसरात राहणारा असल्याने पोलिसांनी त्या परिसरात शोध सुरू केला. त्यावेळी पोलीस शिपाई गणेश सावंत, विनोद वीर व सुमीत देवकर यांना मिळेलेल्या माहितीच्या आधारे आरोपी शाहरुख शाहनवाज शेख Shah Rukh Shahnawaz Sheikh (वय 29, रा. गुलाबनगर, दापोडी) याला सापळा रचून अटक करण्यात आली. (Pimpri Chinchwad Firing Case)
आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार मोहम्मद शोएब नौसार अलवी Mohammad Shoaib Nausar Alvi (वय 26, रा. पवार वस्ती, दापोडी), सागर मलिक उर्फ मायकल व फारुख शेख यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. आरोपीचा शोध घेत असताना मोहम्मद शोएब नौसार अलवी याला ताब्यात घेण्यात आले, तर फारुख शाहनवाज शेख (रा. दापोडी) याला गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतले.

आरोपी शाहरुख शेख व मोहम्मद अलवी हे एकाच परिसरातील असल्याने ते मित्र आहेत. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, शाहरुख शेख याचा भाऊ इरफान शेख याचे गुन्ह्यात नाव घेतल्याचा राग शाहरुख याला होता. याबाबत त्याने त्याचा मित्र मोहम्मद अलवी याला सांगितले. या कारणावरून बुधवारी शाहरुख शेख, मोहम्मद अलवी व त्यांचा मित्र सागर मलिक उर्फ मायकल असे तिघे रिक्षामधून पत्राशेड, लिंकरोड चिंचवड येथे फिर्य़ादी यांच्या घरासमोर आले. शाहरुख याने त्याचा भाऊ इरफान याच्या गुन्ह्यात नाव का घेतले, असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच शेजारी असलेल्या किराणा स्टोअरमध्ये असलेल्या व्यक्तीला सीसीटीव्ही बंद कर अशी धमकी देऊन मारहाण केली व हवेत गोळीबार केला. त्यानंतर आरोपींनी तेथून लिंक रोड भाटनगर व बौद्धनगर येथे जाऊन पुन्हा हवेत गोळीबार केला.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे
(Add CP Dr. Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore),
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 विवेक पाटील (DCP Vivek Patil), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)
पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanwat), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर
(ACP Prashant Amritkar) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाविरोधी पथकाचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले (Senior Police Inspector Ramdas Ingawale),
पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व अंमलदार, युनिट -1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटकर,
युनिट -2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदुरकर व अंमलदार युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड व
अंमलदार तसेच गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने (Harish Mane) व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी केली आहे.

Web Title :- Pimpri Chinchwad Firing Case | Firing at 3 places in Pimpri Chichanwad; criminals arrested within 4 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या दृश्यावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप; म्हणाले – “मराठी माणसाला येड्यात काढताहेत”

Pune Band News | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात पुणे बंदची हाक ! विविध पक्ष व संघटनांतर्फे 13 डिसेंबरला पुणे बंद आंदोलन