ADV

Pimpri Chinchwad Hit & Run Case | पिंपरी-चिंचवडमध्ये एक हिट अँड रन प्रकरणातील आरोपी पोलिसाचा मुलगा, आरोपीला पाठीशी घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न?

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Hit & Run Case | पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या (Bhosari MIDC Police Station) हद्दीत हिट अँड रनची घटना घडली. मात्र, 24 तास उलटून गेल्यानंतर देखील या प्रकरणी पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला नाही. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल (CCTV Footage Viral) झाल्यानंतर पोलिसांनी 24 तासानंतर कार चालकाला अटक केली. कार चालक एका पोलिसाचा मुलगा (Policeman Son) असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी पोलिसाचा मुलगा असल्याने पोलिसांनी कारवाई करण्यात हलगर्जीपणा केल्याची चर्चा आहे.(Pimpri Chinchwad Hit & Run Case)

विनय विलास नाईकरे (Vinay Vilas Naikre) असे या आरोपी कार चालकाचे नाव आहे. तो पोलीस हवालदार विलास नाईकरे यांचा मुलगा असून विलास हे सध्या भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याच पोलीस ठाण्यातील जेलची हवा मुलगा विनय याला खावी लागत आहे. विनय मोशीतील रस्त्यावर बेदरकारपणे कार चालवत होता. त्याचवेळी फिर्यादी यांची पत्नी व मुली रस्ता ओलांडत होत्या. विनय त्याच्याच धुंदीत होता. कारण रस्ता ओलांडणाऱ्या फिर्यादीच्या कुटुंबीयांना विनयच्या बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराने पाहिले आणि त्याने गाडीचा वेग कमी केला. परंतु विनय सुसाट वेगात आला आणि त्याने फिर्य़ादी यांच्या पत्नीला धडक दिली.

व्हिडीओ व्हायरल झाल्याने कारवाई

ही धडक एवढी जोरात होती की फिर्यादी यांची पत्नी सात ते आठ फूड लांब फेकल्या गेल्या. अपघातानंतर विनय घटनास्थळी न थांबता तसाच निघून गेला. यात महिला गंभीर झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी (दि.12) दुपारी साडे तीनच्या सुमारास स्वराज सिटी समोर घडली. अपघाताचा सीसीटीव्ही 24 तासानंतर व्हायरल झाला. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी कार चालकावर कारवाई केली. हा व्हिडीओ व्हायरल झाला नसता तर पोलीस पुत्रावर कोणतीच कारवाई केली नसती, असे बोलले जात आहे. तसेच पोलिसाचा मुलगा असल्याने आणि त्याचे वडील त्याच पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करण्याकडे कानाडोळा केल्याची चर्चा आहे.

म्हणून गुन्हा दाखल केला नाही

घटनेनंतर 24 तासानंतर देखील गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर शंका व्यक्त करण्यात
येत होती. याबात पोलिसांना विचारले असता अपघातानंतर कारचालक विनय हा परत घटनास्थळी आला आणि त्याने जखमी
महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी जबाब घेतला.
परंतु फिर्यादी आणि जखमी यांनी आपली कोणतीच तक्रार नसल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
त्यामुळे अपघातानंतर गुन्हा दाखल करण्यात आला नाही असा दावा पोलिसांनी केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Alibag – Pune Crime News | अती धाडस तरुणाला जीवावर बेतले, पुण्यातील तरुणाचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू

Aundh Pune Crime News | पुणे: लिलावात स्वस्तात गाडी देण्याच्या बहाण्याने साडे 9 लाखांची फसवणूक, दोघांना अटक

Nilesh Lanke-Gajanan Marne | नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार (Video)