पिंपरी-चिंचवड : ‘या’ पध्दतीनं शोधले जातायेत ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रूग्ण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप, घशात खवखव, कणकण वाटते अशी तक्रार असते. अशा व्यक्तींची कोरोना चाचणी केली जाते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्यातील तीव्र व सौम्य लक्षणानुसार रुग्णालयात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येते. त्याच्यावर उपचार सुरु करून त्या व्यक्तीच्या घरातील आणि संपर्कात आलेल्या व्यक्तीची तपासणी केली जाते. तसेच ही व्यक्ती ज्या परिसरात राहते त्या परिसराची महापालिकेकडून सर्वेक्षण केले जाते.

या परिसरातील प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सदस्यांची माहिती घेतली जाते. कुटुंबात सदस्य किती, त्यांना काही आजार आहे का, कोणी बाहेर गावाहून आले आहे का, बाहेर गावी कोणी गेलं आहे का, घरातील कोणत्या व्यक्तीला गंभीर आजार आहे, अशी माहिती महापालिकेकडून घेतली जाते. त्यानुसार संशयिताची तपासणी करून स्वॅब घेतले जाता. स्वॅबचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाते. रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्या व्यक्तीला घरी सोडले जाते. तसेच महापालिकेने विकसित केलेल्या ‘अॅप’ द्वारेही अशी माहिती संकलित केली जाते. अशा प्रकारे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णाची शोध मोहिम राबवली जाते.

याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, हायरिस्क कॅन्टॉक्टमधील नागरिक शोध मोहीम सुरु आहे. यासाठी सध्या रोज एक हजार स्वॅब तपासणी केली जाते. लवकरात लवकर रुग्ण शोधून त्यांचे विलगीकरण करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी मास्क वापरावे यासाठी जनजगृती आणि मास्क न वापरणारे व थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने बंद करण्याची कारवाई सुरु आहे. रुग्ण आढळलेला परिसर सील करून कंटेन्मेंट झोन जाहीर केला जात आहे. या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क वापर करणे हे एक प्रकारे लॉकडाऊन सारखेच आहे. यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे आधिकार दिले आहेत. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्र लागू करणे, निरस्त करण्याचे अधिकार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like