पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी नसून बकाल शहर : खासदार आढळराव-पाटील 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

रस्त्यावरच मासे विक्री, नदी प्रदूषण, अतिक्रमणाचा विळखा, हातगाडी वाल्यांकडून गुंडाना हप्ते आणि म्हणे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी! पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी नसून एक बकाल शहर असल्याचा घणाघाती टीका शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर केली.

आढळराव यांनी  पालिकेचे आयुक्ताची 13 ऑक्टोबरला भेट घेतली होती. त्यावेळी उपस्थित केलेले प्रश्न जैसे थे असल्याची खंत त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे पालिकेतील गटनेते राहुल कलाटे, महिला शहर संघटिका सुलभा उबाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
[amazon_link asins=’9312147307′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’41b802fc-80e3-11e8-a416-cb87d8c2cfba’]

पालिका प्रशासनाच्या उदासीनतेवर आढळरावांनी संताप व्यक्त केला. विशेषत इंद्रायणी नदीप्रदूषणाला पालिका प्रशासनच जबाबदार असल्याबाबत  संताप व्यक्त केला. इंद्रायणी प्रदूषण हे चिखलीतील अनधिकृत भंगार व रसायन कारखान्यांमुळे होत असल्याच्या तक्रारी थेट राष्ट्रीय हरित लवादापर्यंत (एनजीटी) पोचल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यातूनच हा प्रश्न केंद्राच्या पर्यावरण समितीच्या बैठकीत नुकताच चर्चिला गेल्याचेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या प्रश्नावर लवकरच मुंबईत राज्याचे पर्यावरणमंत्री, उद्योगमंत्री, पिंपरी पालिका आणि राज्य प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांची बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. चिखली आणि भोसरीत अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यास प्रशासन घाबरत असल्याबद्दल त्यांनी चीड व्यक्त केली. त्यामुळे नदी प्रदुषणाबरोबर वाहतुकीलाही अडथळा येत असल्याकडे त्यांनी आय़ुक्तांचे लक्ष या भेटीत वेधले. मात्र, भोसरीत राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण असल्याची आयुक्तांनी माहिती नसल्याबद्दल त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले. मिसळ  खाण्यासारखी पालिकेतील सत्ताधारी नुसती उधळपट्टी करीत असून नऊ कोटी रुपयांच्या रस्ते कामासाठी शंभर कोटी रुपये ते ओतत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.