Pimpri-Chinchwad Lockdown : पिंपरीत ‘या’ गोष्टी वगळता सर्व दुकाने खुली होणार, जाणून घ्या काय बंद काय सुरु

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहराचा सध्याचा रुग्णवाढीचा दर 8.5 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसह, सर्व दुकाने मंगळवार (दि.1 जून) पासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. मात्र, PMPML बस, हॉटेल, उद्याने बंद राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील Commissioner Rajesh Patil यांनी दिली. आयुक्तांनी सोमवारी (दि.31 मे) स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे.

सुप्रिया सुळेंनी मांडली महाविकास आघाडीची भूमिका, म्हणाल्या – ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही एकाच घरातील दोन मुलं’

राजेश पाटील Commissioner Rajesh Patil यांनी सांगितले, आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु होती. मात्र, आता या दुकानांबरोबरच इतर कापड, भाजी मार्केट, ज्वेलर्स, कटींग सलुनची दुकाने आदींसह इतर आस्थापना या सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहणार आहेत. कामाचे सर्व दिवस बँका आणि मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहणार आहेत. याची अंमलबजावणी 1 जून पासून केली जाणार आहे.

हे बंद राहील
– दुपारी दोन नंतर सर्व दुकाने बंद राहतील. केवळ मेडीकल दुकाने सुरु राहतील.
– मॉल्सला परवानगी दिलेली नाही. तसेच हॉटेल, रेस्टॉरेन्टमध्ये पुर्वी प्रमाणेच पार्सलची सेवा उपलब्ध असणार आहे.
– शासकीय कार्यालयात केवळ 25 टक्के उपस्थिती
– शेतीविषक दुकाने आठवड्याचे सात दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहतील.

काय सुरु राहील
– महापालिका क्षेत्रातील बँकाचे काम सर्व दिवस सुरु राहील
– अत्यावश्यक सेवेमधील दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहतील
– अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहतील.
– रेस्टॉरंट व बार हे केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरु राहतील
– दुपारी 3 नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास संपूर्णत: प्रतिबंध राहील
– सर्व शासकीय कार्यालये 25 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील
– मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहतील

 

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

Gold Price Today : सोन्यामध्ये वाढ तर चांदीत घसरण, जाणून घ्या आजचे भाव