महिला व बाल विकास मंञी पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – प्रस्तावित रिंगरोड योजनाच्या विरोधात नागरिकांनी आज महिला व बाल विकास मंञी पंकजा मुंडे यांच्या सभेत गोंधळ घातला. आमची घरे रस्त्यात गेली असताना तुम्ही का नाही आले बघायला ? असा सवाल करत गोंधळ घातला. पोलिसांनी दोन महिला आणि तीन पुरषांना अटक केली आहे. गोंधळ घालण्यासाठी पाठविणाऱ्यांनी 15 वर्षे काय केले असा सवाल करत नाव न घेता राष्ट्रवादी-कॉंग्रेसवर हल्ला चढविला.

महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आज रविवारी थेरगाव येथे महिला व बाल विकास मंञी पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन केले होते. व्यासपीठावर पंकजा मुंडे उपस्थित झाल्या. मान्यवरांचे भाषण सुरु झाले. त्यावेळी अचानक एक महिला उठल्या आणि अनधिकृत बांधकामे, रिंगरोड बाधित यांना न्याय मिळाला नाही, शास्तिकर फक्त कागदावरच सुटला असे म्हणत गोंधळ घातला. महिला आणि पुरुषांनी प्रश्नांची भाड़ीमार करत पंकजा मुंढे आणि उपस्थित मान्यवरांना उत्तरे द्या असे संगीतले. अखेर भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर काढून ताब्यात घेतले.

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात गोंधळ घालण्यासाठी विरोधी पक्षाने पाठवले असल्याचे सांगत त्यांनी मागील 15 वर्षात काय केले असा सवाल केला. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने कोणतीच कामे केली नसल्याचे सांगत हल्ला चढविला.

Visit : Policenama.com