पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी कोणतीही कर वाढ नसलेला अर्थसंकल्प सादर

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी कोणतीही कर वाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीपेक्षा 587 कोटीची वाढ करत, यंदा 6183 कोटी रुपयांचे अर्थसंकल्प स्थायीत सादर केले.

अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

– विकास कामांसाठी : 1363 कोटी

– शहरी गरिबांसाठी (BSUP) : 992 कोटी

– नदी सुधार प्रकल्प : 200 कोटी (BONDS)

– PMPML बस सेवा : 190 कोटी

– स्मार्ट सिटी योजना : 150 कोटी

– नगररचना भू-संपादनाकरीता : 140 कोटी

– पाणी पुरवठा विषेशनिधी : 87.5 कोटी

– जेंडर बजेट (महिलांच्या विविध योजनांसाठी) : 40.95 कोटी

– पंतप्रधान आवास योजना : केवळ 36.39 कोटी

– अपंग कल्याणकारी योजना : 33 कोटी

– महापौर विकास निधी : 5 कोटी

– मेट्रो प्रकल्प करीता : 5 कोटी