पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही पैश्यांनी नाही तर मनाने श्रीमंत : गिरीश बापट

पिंपरी-चिंचवड:  पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही पैश्यांनी नाही तर मनाने देखील श्रीमंत असल्याचं मत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे.ते आज दिव्यांग साहित्य वाटप आणि मुद्रा बँक योजना मेळाव्याच्या उदघाटनाप्रसंगी बोलत होते.

बापट म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो. श्रीमंत महानगर पालिका म्हणून नाव पिंपरी-चिंचवडचे नावलौकिक आहे.पण श्रीमंत केवळ पैश्यानी असत नाही.त्याला मनाची श्रीमंती असावी लागते,ते पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना दिली आहे.पैश्यानी नाहीतर मनाने श्रीमंत पालिका आहे त्याचा मला आनंद असल्याचे गिरीश बापट म्हणाले. पुणे जिल्ह्यातील ७६ हजार नागरिकांना मुद्रा योजनेचा फायदा झाला आहे.त्याची रक्कम ८४० कोटी रुपयांच्या घरात आहे.ज्याला घर दार,संपत्ती नाही अश्या तरुणांना व्यवसायात काही तरी करून दाखवायचे आहे.अश्यांना ही योजना उपयोगी आहे,अस बापट म्हणाले.यावेळी देशाचे केंद्रीय अर्थराज्य मंत्री शिवप्रसाद शुक्ला पालकमंत्री श्री. गिरीश बापट,खासदार श्री.अमर साबळे,शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे,सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.