Pimpri Chinchwad Municipal Corporation | सात दिवसानंतरही पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद रिक्त; स्मिता झगडे यांची नियुक्ती कोणी रोखली?

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Municipal Corporation | पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांची बदली झाली असून त्यांच्या जागी स्मिता झगडे (Smita Jagade) यांची वर्णी लागली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश (Transfer orders) होऊन सात दिवस उलटले. तरी देखील महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रिक्त आहे. झगडे यांना आयुक्त शेखर सिंह (Commissioner Shekhar Singh) यांनी रूजू करून न घेतल्यामुळे पालिका वर्तुळात झगडे यांची नियुक्ती कोणी रोखली, अशी चर्चा होत आहे. (Pimpri Chinchwad Municipal Corporation )

राज्याच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव (Deputy Secretary) प्रियांका कुलकर्णी-छापवाले (Priyanka Kulkarni-Chapwale) यांनी 13 सप्टेंबर 2022 रोजी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदाबाबत आदेश काढले. या आदेशाप्रमाणे विकास ढाकणे यांची महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली. त्यांच्या जागी महापालिकेत कार्यरत असलेल्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. (Pimpri Chinchwad Municipal Corporation)

या आदेशानंतर सात दिवसे उलटले आहेत. तरी देखील झगडे यांना अतिरिक्त आयुक्तपदावर रूजू करून घेण्यात
आलेले नाही. आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांना रूजू न करून घेतल्याने पालिका वर्तुळात उलट सूलट चर्चा होत आहे.
झगडे यांची बदली शिंदे गटामार्फत (Shinde Group) झाली असून शहर भाजपमधील काही पदाधिका-यांचा झगडे यांना विरोध आहे.
त्यांनी त्यांची नियुक्ती रोखली आहे.
त्यामुळे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी झगडे रूजू होणार की त्यांच्याजागी आणखी दुस-या कोणाची वर्णी लागणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title :- Pimpri Chinchwad Municipal Corporation | Post of Additional Commissioner of Pimpri Municipality vacant even after seven days; Who blocked the appointment of Smita Jagde?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Police | गणेश विसर्जन मिरवणुकीत खाकी वर्दीतील पोलीस नाचल्यावरुन वादंग, DGP कार्यालयाने दिले ‘हे’ निर्देश

Rupee Co Op Bank | रुपी बँकेच्या दोषी संचालक, अधिकार्‍यांवर कारवाईसाठी उच्च न्यायालयात याचिका

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, भाजप नेत्याच्या अध्यक्षतेखाली नेमली मंत्रिमंडळ उपसमिती