पिंपरी चिंचवड महानरपालिकेची स्थायी समिती सभा तहकूब

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

धुळे व दिल्ली येथे हत्या झालेल्या नागरिकांना श्रंद्धांजली वाहून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा तहकूब करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. मात्र शहरात होणाऱ्या इंदिरा आवास योजनेबाबत भाजपातील गटातटात एकमत न झाल्यामुळे आजची सभा तहकूब करण्यात आली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.
[amazon_link asins=’B071CMQ6N2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’da7e6660-7f78-11e8-b82d-7329e8d598f0′]

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अर्थिक दृद्ष्या दुर्बल घटकांसाठी बोऱ्हाडेवाडी येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. तो विषय आज स्थायी समितीच्या सभे पुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु, या विषयावर भाजपामधील दोन गटांमध्ये एकमत न झाल्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुस्की ओढवली आहे. अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे. मात्र, सभेत धुळे व दिल्ली येथे झालेल्या हत्येतील मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहून आजची सभा तहकूब करण्यात आली आहे.