पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  आईवरून शिवीगाळ केल्याने एका मद्यपीने (Alcoholic) दुसऱ्या मद्यपीचा (Alcoholic) भर रस्त्यात दगडाने ठेचून खून केला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडीत मंगळवारी (दि. 1) भरदुपारी ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तातडीने घटनास्थळावरून अटक केली आहे.

ICC नं घेतले महत्त्वाचे निर्णय ! वनडे-टी 20 विश्वचषक संघाच्या संख्येत वाढ, चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल झाला ‘हा’ निर्णय

अनिल शिंदे (वय- 50) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर यश गोपी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास भरवस्तीतून आरोपी यश आणि अनिल हे जात होते. त्यावेळी दोघांनी मद्यपान केले होते. दरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि अनिल शिंदे याने यशला आईवरून शिवीगाळ केली. त्यामुळे आरोपीला प्रचंड राग आला. त्याने रागाच्या भरात रस्त्यावर पडलेला दगड अनिलच्या डोक्यात घालून ठेचून खून केला. दरम्यान हे थरकाप उडवणारे दृश्य घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक पाहत होते. मात्र आरोपीला अडवण्याचा कोणीही प्रयत्न केले नाही. घटनास्थळी केवळ बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे घटनास्थळी धाव घेतली. आरोपी यश हा अनिलला दगडाने ठेचून मारत असताना त्याला ताब्यात घेतले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. यात अनिलचा मृत्यू झाला. आरोपीला अटक केली असून भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Pune : शहर गुन्हे शाखेतील ‘त्या’ पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन, उपायुक्तांनी केली कारवाई

कोरोनानंतर कोरडा खोकला अन् कफामुळं असाल परेशान तर ‘या’ टिप्सचा नक्की होईल फायदा; जाणून घ्या