Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये 276 नवीन ‘कोरोना’ रुग्ण, रुग्णसंख्या 3776

पिंपरी/पुणे : पोलीसामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या वाढ होत आहे. आज (शुक्रवार) शहराच्या विविध भागामध्ये 232 आणि हद्दीबाहेरील 44 अशा एकूण 276 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3776 इतकी झाली आहे. आज 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये 6 शहरातील आहेत तर 1 जण शहराबाहेरील आहे.

आज शहरामध्ये 79 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2233 इतकी झाली आहे. आज शहरामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 85 झाली आहे. यामध्ये शहरातील 53 आणि शहराबाहेरील 32 जणांचा समावेश आहे. शहरातील मोहननगर चिंचवड येथील 62 वर्षाची महिला, भीमनगर पिंपरी येथील 60 वर्षाची महिला, चिंचवडेनगर येथील 65 वर्षीचे पुरुष, रिव्हररोड पिंपरी येथील 67 वर्षाचे पुरुष, साईनगर मामुर्डी येथील 66 वर्षाचे पुरुष, निगडी येथील 80 वर्षाचे पुरुष व शितळानगर देहूरोड येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे फ्ल्यू सारखे आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. तसेच घराबाहेर पडू नये. नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. पावसामध्ये मास्क भिजणार नाही याची काळजी घ्यावे. तसेच अतिरिक्त एक मास्क जवळ बाळगावा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like