Homeक्राईम स्टोरीPimpri-Chinchwad News : भाजपचे नेते बाळासाहेब नेवाळे यांना अटक

Pimpri-Chinchwad News : भाजपचे नेते बाळासाहेब नेवाळे यांना अटक

वडगाव मावळ : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांना कामशेत पोलिसांनी अटक केली आहे. बाळासाहेब नेवाळे यांनी विकास सोसायटीच्या मतदारयादीत बनावट नाव नोंदवून ठराव केला होता. याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता 25 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गोवित्री ग्राम विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक 2015 मध्ये झाली होती. याच निवडणुकीच्या मतदारयादीत बाळासाहेब नेवाळे यांच्या सांगण्यावरून बनावट नाव नोंदणी झाली होती. त्यामध्ये सोसायटीचे सभासद नसलेले बाळू आखाडे आणि प्रकाश गायकवाड यांचे नाव नोंदवण्यात आले होते. याशिवाय त्यांचा बनावट सभासद क्रमांक टाकून, बनावट मतदारयादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात आले होते.

त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या सभासदपदाच्या निवडीसाठी सोसायटीकडून पाठवण्यात येणारा एक उमेदवार स्वत: बाळासाहेब नेवाळे आहेत. याबाबत संचालकांची मीटिंग घेऊन प्रस्ताव तयार करण्यात आला होता. सदरचा बनावट आणि खोटा प्रस्ताव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे जमा केला.

नेवाळे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल

बाळासाहेब नेवाळे आणि इतर तिघांवर कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरूनच त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल कदम करत आहेत.

एकेकाळी नेवाळे होते अजित पवारांचे समर्थक

बाळासाहेब नेवाळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकेकाळी कट्टर समर्थक होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्येही त्यांनी महत्त्वाचे पद मिळाले नाही.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News