Pimpri-Chinchwad News | पिंपरीत लोकप्रतिनिधींकडून कोरोना नियमांचे उल्लंघन; गर्दी करत विकासकामांचे केले उद्धाटन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri-Chinchwad News | कोरोनाचा वाढता संसर्गाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध (Restrictions) लागू करण्यात (Pimpri-Chinchwad News) आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका असे सांगितले होते. तरीही कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. पिंपरीत महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) विविध विकासकामांचे नुकतंच उद्घाटन करण्यात आले. पाच-सहा ठिकाणी हा कार्यक्रम झाला. त्यावेळी सर्वच ठिकाणी 50 हून अधिक नगरसेवक आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे तेथे फिजिकल डिस्टन्स पाळले गेले नाही. काहींनी मास्क तर अर्धवट लावला होता. त्यामुळे नियम फक्त सर्वसामान्य लोकांनाच आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे आतापासून राजकीय मंडळी कामाला लागली आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू केले आहेत. मात्र, हे निर्बंध केवळ सामान्यांसाठीच आहेत असा प्रश्न पडला आहे. राजकीय मंडळींकडून सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करत मांदीयाळी भरली जात आहे. तेथे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असले तरी त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करण्यात येत आहे. (Pimpri-Chinchwad News)

पिंपळे गुरव येथील जगताप डेअरी चौकातील आणि सुदर्शन नगर येथील ग्रेड सेपरेटर, बिजलीनगर येथील भुयारी मार्ग, वाकड ते नाशिक फाट्याकडे ग्रेड सेपरेटर डांगे चौक येथे ग्रेडसेपरेटर, प्रभाग क्र. 29 मधील श्रीमती शेवंताबाई खंडूजी जगताप माध्यमिक शाळा क्र. 58 चे विस्तारीकरण आदी ठिकाणी हे कार्यक्रम झाले. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते तर पिंपळे सौदागर येथे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शहराध्यक्ष संजोग वाघेरे (Sanjog Vaghere) यांच्या हस्ते उद्घाटन केले. तर पिंपळे सौदागर येथे जगताप डेअरी जवळील ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन सकाळी 11 वाजता होणार होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने ते सकाळी साडे नऊलाच शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते उद्घाटन केले. त्यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे (Nana Kate), मयूर कलाटे (Mayur Kalate) उपस्थित होते. त्यानंतर भाजपाने (BJP) त्याच ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते साडे अकराला उद्घाटन केले.

शिवसेनेचा बहिष्कार –

डांगे चौकातही ग्रेडसेपरेटर तयार करण्यात आला आहे. त्याचेही उद्घाटन करण्यात आले मात्र, या उद्घाटन कार्यक्रमास शिवसेनेने (Shiv Sena) बहिष्कार टाकला. शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले (Sachin Bhosle), नगरसेवक निलेश बारणे (Corporator Nilesh Barne) हे अनुपस्थित होते. यासंदर्भात बोलताना शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले म्हणाले, उद्घाटन कार्यक्रम महापालिकेचा होता. मात्र तरीही सत्ताधारी भाजपने राजकारण करत कार्यक्रमात भाजपाचे झेंडे लावले. त्यामुळे आम्ही बहिष्कार टाकला होता.

Web Title : Pimpri Chinchwad News | lof of  corporators and political  leaders inauguration pimpri corona trampled rules

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी