Pimpri-Chinchwad News | लग्नाचे आमिष दाखवून नंतर जातीचे कारण सांगणार्‍यास पोलिसांनी केली अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri-Chinchwad News | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार पिंपरी (Pimpri) परिसरात घडला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाची विचारणा केल्यावर तिला तु खालच्या जातीची असल्याचे सांगून नकार देणार्‍याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
संतोष रामदास शिवेकर (वय २९, रा. करंजविहिरे, ता. खेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

हा प्रकार जून २००९ पासून १६ मे २०२१ दरम्यान घडला आहे. याप्रकरणी एका महिलेने चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मागासवर्गीय असल्याचे आरोपी संतोष शिवेकर याला माहिती होते. असे असताना त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर राहत्या घरी तसेच चाकण, खेड येथील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी शारिरीक संबंध केले.

त्यानंतर तिने लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने ती खालीच्या जातीची असल्यामुळे त्यांच्याशी लग्नास नकार दिला. शेवटी तिने चाकण पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संतोष शिवेकर याला अटक केली आहे.

Web Titel : Pimpri-Chinchwad News | pimpri police arrest one

हे देखील वाचा

Big Breaking News

पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरात ‘झूम बराबर झूम’ जोमात; पत्त्याच्या ‘क्लब’ आणि
‘मटका’ अड्ड्यावर गुन्हे शाखेचे रेड; 72 जणांवर कारवाई !

नेमकं काय आहे प्रकरण, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आता अवैध धंद्यांना
पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करणार का ?

‘त्या’ पोलिसांवर कारवाई होणार का?