Pimpri Chinchwad News | मान्यता 10 कोटींची, मंजूर केले 25; खासदार श्रीरंग बारणेंच्या घरासमोरील रस्ता चकाचक?

पिंपरी चिंचवड : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad News) अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार रस्ते व पदपथ विकसित होत आहेत. मात्र, या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही अर्बन स्ट्रीट प्रकल्प पुरता फसला आहे. तरीही, या अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली प्रशासनाने पुन्हा कोट्यवधी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक थेरगाव या रस्त्यावर अर्बन स्ट्रीटनुसार रस्ता व पदपथ विकसित करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय (Pimpri Chinchwad News) मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पिंपरी-चिंचवड शहरातील शिलेदार समजल्या जाणाऱ्या खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरासमोरील हा रस्ता असून, या रस्त्याला चकाचक करण्यात येणार आहे. येथील रस्ता आणि फूटपाथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित होईल. त्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटाची वाट धरली होती, त्यामुळे त्यांची महापालिकेत ताकद वाढली असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. (Pimpri Chinchwad News)

या रस्त्यावर पदमजी पेपर मिल औद्योगिक प्रकल्प, बिर्ला हॉस्पिटल, पशुसंवर्धन खात्याचे डेअरी फार्म, काही शाळा, कॉलेज आणि व्यावसायिक व रहिवासी भाग आहेत. या रस्त्यावर वाहनांबरोबर पादचाऱ्यांचीसुद्धा भरपूर वर्दळ असते. त्यामुळे इथे वारंवार वाहतूक कोंडी होते. शिवाय, पदपथावर पुरेशी विद्युत व्यवस्था नाही. तसेच, वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी व पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी फूटपाथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्याची नागरिकांची व व्यावसायिकांची मागणी असल्याचा दावा प्रशासन करत आहे.

या कामासाठी अंदाजपत्रकातील खर्चाच्या तरतुदीकडे दुर्लक्ष करून कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार
मे. ॲश्युअर्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी केलेल्या विस्तृत सर्वेक्षणानुसार स्थापत्य,
विद्युत, पाणीपुरवठा व जलनिस्सारणविषयक कामाचे अंदाजपत्रक सन २०२२ -२०२३ च्या दरसूचीनुसार तयार केले
आहे. त्यानुसार या रस्त्याच्या कामासाठी २४ कोटी ९७ लाख रुपये इतका खर्च येईल असे, त्यांच्या अंदाजपत्रक आहे.
मात्र, पालिकेच्या सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकामध्ये या कामासाठी फक्त १० कोटी इतकी प्रशासकीय मान्यता
आहे. परंतु, आयुक्त सिंह यांनी या रस्त्यासाठी २४ कोटी ९७ लाख इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

Web Title :-  Pimpri Chinchwad News | road in front of the house of chief minister shiledar srirang barane is bright about 25 crores will be spenti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या दृश्यावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप; म्हणाले – “मराठी माणसाला येड्यात काढताहेत”

Sanjay Raut | ‘मंत्री महोदय, ही धमकी समजायची का?’ – संजय राऊत

LPG Gas Cylinder Charges | डिलिव्हरी बॉय ‘गॅस टाकी घरपोच’चे अतिरिक्त पैसे घेतोय, तर ही पोस्ट नक्की वाचा