Pimpri-Chinchwad News | नातेवाईकांच्या मदतीने सुनेनेच फोडली कार, सासुची केली तक्रार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri-Chinchwad News | नातेवाईकांना घेऊन येऊन सुनेने इमारतीबाहेर पार्क केलेल्या कारवर दगड, सिमेंटचे गट्टे, लोखंडी रॉडने काचा फोडल्या तसेच दरवाज्यावर दगड मारुले व सीसीटीव्ही कॅमेरे तोडल्याची तक्रार सासुने केली आहे. यावरुन चिखली पोलिसांनी सून नम्रता धनराज कर्पे (रा. चिखली), मयुर बनकर, राहुल बनकर, अजय बनकर, संजय बनकर, अप्पा गोरे, पांडुरंग वाडकर (सर्व रा. उरळी कांचन) अशी गुन्हा दाखल केला आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

याप्रकरणी निर्मला मधुकर कर्पे (वय ५६, रा. देहु आळंदी रोड, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जून रोजी रात्री सव्वादहा वाजता घडली. फिर्यादी या घरी झोपलेले असताना त्यांच्या घराच्या बाहेर मोठमोठ्याने आरडा ओरडा करण्याचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांची सून नम्रता कर्पे व तिचे नातेवाईक बाहेर उभे होते.

त्यांच्या हातात सिमेंटचे गट्टु व लोखंडी रॉडने गेटचे लॉक तोडून ते सर्व जण बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आले. त्यांनी पार्किंगमध्ये उभी असलेली वॅगनर कारवर दगड, सिमेंटचे गट्टु, विटा व लोखंडी रॉडने गाडीचे पाठीमागे, समोरील बाजूच्या काचा, पाठीमागील दोन्ही टेललॅम्प, बोनेटवर मारुन नुकसान केले. तसेच त्यांच्या हातातील दगडांनी दरवाजावर मारुन तेथे लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून ८० ते ९० हजारांचे नुकसान केले.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Pimpri-Chinchwad News | With the help of relatives daughter in law broke the car, mother in law complained

 

हे देखील वाचा

Big Breaking News

पुण्याच्या लोणीकाळभोर परिसरात ‘झूम बराबर झूम’ जोमात; पत्त्याच्या ‘क्लब’ आणि
‘मटका’ अड्ड्यावर गुन्हे शाखेचे रेड; 72 जणांवर कारवाई !

नेमकं काय आहे प्रकरण, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आता अवैध धंद्यांना
पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करणार का ?

‘त्या’ पोलिसांवर कारवाई होणार का?