पार्थ पवार-श्रीरंग बारणे एकाच वेळी देहूच्या मंदिरात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – निवडणुका आल्या कि राजकीय पक्ष लोकांना आपलेसे करण्यासाठी मंदिराचा आधार घेतात. अशीच एक घटना आज मावळच्या दोन प्रतिस्पर्धीच्या बाबतीत घडली आहे. आज तुकाराम बीज निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे एकाच वेळी देहूच्या तुकाराम महाराज मंदिरात गेल्याची घटना आज घडली आहे.

देहूच्या संत तुकाराम महाराज मंदिरात लोकसभेचे राष्ट्रवादी उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे एकत्रित आले आणि उपस्थितीतांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र दोघे हि एकत्र येणे हा फक्त योगायोग होता असे तेथील हालचाली वरून समजून आले आहे.

राष्ट्रवादीची प्रतिष्ठापणाला लागलेला मतदारसंघ म्हणून मावळ मतदारसंघाकडे सध्या बघितले जाते आहे. तर श्रीरंग बारणे यांनी पाच वर्षांत केलेल्या कामाच्या बळावर जनतेचा पुन्हा कौल मागण्याची तयारी सुरु केली आहे. अशातच दोघांनी जनतेचे आशीर्वाद मागण्याबरोबर तुकारामाचे मंदिर गाठले होते. त्यामुळे तुकाराम महाराजांनी नेमके कोणाला आशीर्वाद दिले हे २३ मे रोजी समजणार आहे.

तसेच संत ज्ञानेश्वर एका अभंगात देव कोणाचा पक्ष घेतो हे खूप चांगल्या पद्धतीने सांगतात. जाणीव नेणीव भगवंती नाही। दोन्ही पक्ष पाही उद्धरिते। त्यामुळे तुकाराम महाराज कोणाचा उद्धार करणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

Loading...
You might also like