Pimpri-Chinchwad : पीएमपीएमएल बस वाहकाला प्रवाशाकडून बेदम मारहाण

पिंपरी-चिंचवड: पोलीसनामा ऑनलाइन
पीएमपीएमएलच्या वाहकाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी निगडी येथील भक्ती शक्ती चौकात घडली आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसात वाहक प्रशांत ढोले यांनी तक्रार नोंदवली आहे.याप्रकरणी अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,”फिर्यादी प्रशांत ढोले हे पीएमपीएमएल बसचे वाहक आहेत, शुक्रवारी त्यांच्यासोबत चालक म्हणून उद्धव कसबे हे होते. त्यावेळी कासारवाडी येथून एक अज्ञात प्रवाशी बस मध्ये चढला परंतु तो काही आत येण्यास तयार नव्हता तो दरवाज्यातच थांबला होता.त्यामुळे वाहक प्रशांत ढोले यांनी दरवाज्यात उभे राहू नका असे सांगितले असता याचाच राग मनात धरून, त्यांच्याशी हुज्जत घातली तसेच गैरवर्तन केले. बस पुढे गेल्यानंतर प्रवाश्याने फोनवरून तिन सहकाऱ्याला भक्ती शक्ती येथे येण्यास सांगितले, ते येताच वाहक प्रशांत ढोले याना चौघांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता पोलिसात तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी चालक उद्धव लोंढे यांना दिली याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक नम्रता डावरे या करत आहेत.अद्याप संशयित आरोपीने अटक केलेली नाही.