Pimpri Chinchwad Police | 3-4 दिवसांपूर्वी निगडी, वाकड आणि देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर छापे; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 3 API आणि 18 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड मध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Police Crime Branch) पथकाने छापेमारी केली होती. अवैध धंद्यावर छापेमारी केल्यानंतर आयुक्तांनी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह (Senior Police Inspector) तीन सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि 18 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी अंतर्गत बदली (Police Officers Transfer) केली आहे. गुन्हे शाखेने 3 दिवसांपूर्वी निगडी (Nigdi Police Station), वाकड (Wakad Police Station) आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या (Dehurod Police Station) हद्दीत ही कारवाई केली होती. यांनंतर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची बदली केल्याने पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Pimpri Chinchwad Police)

 

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी, देहूरोड आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैधपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर (Gambling Den) छापे टाकले होते. या कारवाईत 32 जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी (Raid) झाली त्याच ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आयुक्तांनी तडकाफडकी बदली केली. (Pimpri Chinchwad Police)

 

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे (Senior Police Inspector Ranganath Unde) यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची नियंत्रण कक्षात (Control Room) बदली केली आहे. तर देहूरोड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे (API Digambar Atigre) यांची बावधन वाहतूक विभागात (Bavdhan Traffic Branch) बदली केली आहे. तसेच वाकड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील (API Santosh Patil), संभाजी जाधव (API Sambhaji Jadhav) यांची देखील बावधन वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.

याशिवाय वाकड पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर (Bibhishan Kanherkar), राजेंद्र मारणे (Rajendra Marne), बाबाजान इनामदार (Babajan Inamdar), हवालदार दीपक साबळे (Deepak Sable), स्वप्नील खेतले (Swapnil Khetle), विंदू गिरी (Vindu Giri), प्रमोद कदम (Pramod Kadam),
विक्रांत चव्हाण (Vikrant Chavan), कातेय खराडे (Katey Kharade),
अतिक शेख (Atiq Sheikh), अजय फल्ले (Ajay Phalle), तात्यासाहेब शिंदे (Tatyasaheb Shinde),
भास्कर भारती (Bhaskar Bharti) यांची तर देहूरोड पोलीस ठाण्यातील सामील प्रकाश (Samil Prakash),
सुनील यादव (Sunil Yadav), सचिन सेजल (Sachin Sejal), स्वप्नील साबळे (Swapnil Sable),
सुनील पवार (Sunil Pawar) या 18 जणांची बावधन वाहतूक शाखेत बदली केली आहे.

 

Web Title :- Pimpri Chinchwad Police | 3-4 days ago raids on illegal businesses in Nigdi,
Wakad and Dehurod police station limits; transfer of 3 APIs and 18 staff
including Senior Police Inspector nigdi police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा