Pimpri Chinchwad Police | आगमनादिवशीच गणपती बाप्पा पिंपरी चिंचवड पोलिसांवर प्रसन्न, 394 पोलिसांना दिला ‘हा’ प्रसाद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 394 पोलिसांना गणपती बाप्पा पावला आहे. गणपतीच्या आगना दिवशी आयुक्तालयातील 390 जणांना पोलीस शिपाई, नाईक पदावरुन हवालदार तर चार जणांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी काढले आहेत. (Pimpri Chinchwad Police)

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती होऊन पाच वर्षे झाली आहेत. मात्र याठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे. पोलीस शिपाई पदासाठी दोन वेळा भरती झाली आहे. इतर जिल्ह्यातून बदली होऊन शहरात येणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस भरतीतून मिळालेल्या पोलिसांची मोट बांधून आयुक्तालयाचा कारभार चालवला जात आहे. विविध सण, महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी बाहेरुन अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवली जाते. बंदोबस्ताशिवाय शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास पोलिसांना करावा लागत असल्याने आयुक्तालयात असलेले मनुष्यबळ राखीव ठेवावे लागते. (Pimpri Chinchwad Police)

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 394 जणांना बढती दिली आहे. पोलीस दलात 25 मे 2004 पूर्वी रूजू झालेल्या पोलिसांना सेवाज्येष्ठतेनुसार बढती देण्यात आली आहे. पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक पदावरुन 390 जणांना पोलीस हवालदार तर पोलीस दलात 30 वर्षे सेवा पूर्ण करणारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या चार जणांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक शाखेतील गजेंद्र जाधवर, वाकड पोलीस ठाण्यातील अरुण भालेकर यांच्यासह मनोज बनसोड, ज्ञानेश्वर पोटे यांचा समावेश आहे.

पोलीस नाईक पद रद्द

पोलिसांच्या पदोन्नती साखळीमध्ये पोलीस शिपाई-पोलीस नाईक-पोलीस हवालदार-सहायक पोलीस उपनिरीक्षक अशा
तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. एका पदावर दहा वर्षे सेवा केल्यानंतर पदोन्नती मिळते.
पोलीस शिपाई पदावर भरती झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहचेपर्यंत वयाची अडचण निर्माण होते.
त्यामुळे पोलिसाचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. यासाठी पोलीस दलातील पदोन्नती साखळीतील पोलीस नाईक
हे पद गृह विभागाने रद्द केले आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई आणि नाईक संवर्गातील
पोलिसांना हवालदार पदावर बढती दिली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)

Supriya Sule | अजित पवारांचा अपमान करण्यासाठी सोबत घेतलं का? पडळकरांच्या विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला थेट सवाल