Pimpri Chinchwad Police | रावण टोळी प्रमुखाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या 6 सराईतांना अटक; पिस्तुल, काडतुस जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Crime Branch Police | रावण टोळीचा (Ravan Gang) म्होरक्या मयत अनिकेत जाधव (Aniket Jadhav) याचा वाढदिवस (Birthday) साजरा करण्यासाठी जमलेल्या 6 सराईत गुन्हेगारांना अटक (Arrest) करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch Police) गुंडा विरोधी पथकाने (Anti-punk squad) रावेत येथील जाधव वस्ती येथे केली.

अनिरुद्ध उर्फ विकी उर्फ बाळा राजु जाधव (वय-24 रा. जाधव वस्ती, रावेत), धिरज दिपक जैयस्वाल (वय-26 रा. दत्तमंदीराजवळ, चिंचवड), रोहन राजेंद्र कांबळे (वय-24 रा. गिरीराज हौसींग कॉम्प्लेक्स, चिंचवड), अमित भगीरथ मल्लाव (वय-26 रा. बिजलीनगर चिंचवड), मंगेश देविदास नाटेकर (वय-22 रा. रमाबाईनगर, रावेत), अक्षय लहु चौगुले (वय-23 रा.रस्टण कॉलनी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
रावण टोळीचा पूर्वीचा म्होरक्या मयत अनिकेत जाधव याचा वाढदिवस केक कापुन साजरा करुन विरोधी टोळीला प्रत्युत्तर देणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार शुभम कदम यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे रावेत येथील जाधव वस्तीत असलेल्या अनिकेत जाधवच्या घरावर छापा टाकून टोळीतील 6 जणांना अटक केली.
अटक केलेल्या आरोपीपैकी मयत अनिकेतचा भाऊ बाळा जाधव याच्याकडून 1 गावठी पिस्तुल (Pistol) आणि 2 जिवंत काडतुसे (Cartridge) जप्त केली.
आरोपींविरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehurod Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता 25 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ (Deputy Commissioner of Police Sudhir Hiremath), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीष माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रविण तापकिर, गणेश मेदगे, विजय तेलेवार, रामदास मोहीते, प्रमोद गर्जे व शुभम कदम यांनी केली.

Web Title :-  Pimpri Chinchwad Police | 6 inmates arrested for celebrating Ravana gang chief’s birthday; Pistols, cartridges confiscated

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा केसमध्ये समोर आला शर्लिन चोपडाचा नवीन व्हिडिओ, केला धक्कादायक खुलासा (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळ्यात, कोरोनाकाळात केले ‘हे’ उद्योग, जाणून घ्या प्रकरण

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या