सराईत चोरट्याकडून ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक करुन त्याच्याकडून ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

गणेश उर्फ अण्णा दगडू शिंदे (२६, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. चोरट्याकडून २४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, महागडी घड्याळे आणि घरफोडी करण्याचे साहित्य, असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

वाकड परिसरात सोळा नंबर बस स्टॉप जवळ एक तरुण मोबाईल विकण्यासाठी फिरत असल्याची माहिती पोलीस हवालदार नारायण जाधव यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी परिसरात सापळा रचून गणेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोबाईल फोनबाबत पोलिसांनी चौकशी केली असता तो चोरीचा असल्याचे सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, उपनिरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी नारायण जाधव, संतोष आसवले, शावरसिद्ध पांढरे, लक्ष्मण आढारी, तुषार काळे, अतुल लोखंडे, धर्मराज आवटे, संजय गवारे, धनाजी शिंदे, अजिनाथ ओंबासे, वासुदेव मुंढे, सुरेश जायभाये, आदिनाथ मिसाळ, सुनील गुट्टे, गोविंद चव्हाण, नितेश बिच्चेवार, नाजूका हुलावळे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com