Pimpri-Chinchwad Police | खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक, आरोपींकडून पिस्टल जप्त

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri-Chinchwad | पिस्तूल बाळगल्या (pistol) प्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police ) चार जणांना अटक (Arrest) केली आहे तर एका अल्पवयीन मुला विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैंकी तिघांवर गंभीर गुन्हे दाखल असून दोनजण खुनाच्या गुन्ह्यात 6 महिन्यापासून फरार होते. पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) ही कारवाई शुक्रवारी (दि.23) दुपारी पाचच्या सुमारास म्हेत्रेवस्ती, चिखली येथे करण्यात आली. Pimpri-Chinchwad Police | chikhali police arrest criminals in murder case who are abscond

हर्षद कुमार शिंदे (वय-23 रा. शिंदेवस्ती, लोणीकंद, ता. हवेली), ओमकार उर्फ सोन्या विलास नांगरे (वय-20 रा. मरकळरोड, आळंदी), अजिंक्य दादासाहेब मसकुटे (वय-23 रा. खामगाव, ता. दौंड), ऋतिक काळुराम शिवले (वय-19 रा. शिंदे आळी, लोणीकंद असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एका विधिसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अंमलदार
संतोष संपकाळ यांना चिखली येथील म्हेत्रेवस्तीमधील जगदंबा हाईट्समधील एका व्यक्तीकडे
गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन झडती घेतली.
त्यावेळी त्यांच्याकडून 35 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.

 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी ओंकार उर्फ सोन्या विलास नांगरे (वय-20) याच्या विरोधात भोसरी, भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC), कोतवाली जि. अहमदनगर, दिघी पोलीस ठाण्यात (Dighi police station) गुन्ह्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर हर्षद कुमार शिंदे (वय-23) आणि अल्पवयीन मुलावर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police) खुनाचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार होते. पोलिसांनी सहा महिन्यांनी आरोपींना अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन आनंद भोईटे (deputy commissioner of police Anand Bhoite) , सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक-पाटील (assistant commissioner of police sanjay naik-patil) यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने (Senior Police Inspector Satish Mane) , तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर (Police Sub Inspector Vivek Kumatkar) , सहायक फौजदार आनंद चव्हाण, पोलीस हवालदार सुनिल शिंदे, चेतन सावंत, बाब गर्जे, महेश घुमटकर, विनायक कोकणे, पोलीस नाईक विश्वास नाणेकर, गणेश टिळेकर, विपुल होले, चंद्रशेखर चोरघे, कबीर पिंजारी, संदिप मासाळ, सचिन गायकवाड, पितांबर गंबरे, संतोष सपकाळ, सचिन नलावडे, सचिन बांगर यांच्या पथकाने केली.

Web Title : Pimpri-Chinchwad Police | chikhali police arrest criminals in murder case who are abscond

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pegasus Effect | महाराष्ट्र सरकारचे फरमान, आवश्यक असेल तरच वापरा मोबाइल, अन्यथा लँडलाईनचा करा वापर

Employees Salary Hike | खुशखबर ! भारतात पुढील वर्षी लोकांच्या सॅलरीत होऊ शकते वाढ, जाणून घ्या कारण

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! जुलैच्या ‘या’ तारखेला PF अकाऊंटमध्ये येईल मोठी रक्कम, इथं चेक करा बॅलन्स