पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे मुख्यालय सुरु

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पोलीस चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस मुख्यालय सुरु झाले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, सहायक आयुक्त राम जाधव, सतीश पाटील, गणपतराव माडगूळकर, आश्विनी केदार, श्रीधर जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या समस्या हळू हळू सुटताना दिसत आहेत. ऑटो क्लस्टर येथून आयुक्तालयाची इमारत चिंचवड, प्रेमलोक पार्क येथे झाली आणि तेथून कामकाज सुरु झाले. मनुष्यबळ काहीशा प्रमाणात उपलब्ध झाले. त्यानंतर वाहनांची समस्या होती तेही वॉलसवॅगन कंपनीने नुकत्याच पाच कार पोलिसांना दिल्या आहेत. तर लवकरच आणखी एक कंपनी वाहने देणार आहे.

आगामी लोकसभाच्या निवडणुका लक्षात घेता बाहेरुन पोलीस बंदोबस्त मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आणि आयुक्तालयासाठी उपयुक्त असणारे मुख्यालय सुरु झाले. निगडी, प्राधिकरण येथे महापालिकेच्या शाळेत सुरु करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us